CoronaAurangabadUpdate : राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनाही कोरोनाची लागण

महाविकास आघाडीतील आणखी एक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सत्तार यांनीच ही माहिती दिली आहे. सत्तार यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी आपली टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. काळजीचं कारण नाही. प्रकृती चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनीच आपली चाचणी करून घ्यावी असं आवाहनही सत्तार यांनी केलं आहे.
कोरोनाच्या काळात मदत कार्यासाठी बाहेर जाणं होतं आहे. त्यावेळी कोरोनाची बाधा झाली असेल.परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य ते उपचार घेऊन ‘होम क्वारंटाइन’ व्हावं असं आवाहनही अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.