Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मिनी घाटीतून दोन कोरोनाबाधात महिला रुग्णांचे पलायन, पोलीस घेताहेत शोध !!

Spread the love

औरंगाबाद – चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित दोन महिला रुग्ण सोमवारी संध्याकाळी ८.३०वा. फरार झाल्याचा गुन्हा जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सुरक्षारक्षकांनी दिलेल्या फिर्यादीमुळे सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सिडको एन ५ या परिसरातील या दोन महिला आहेत. दोन रुग्ण फरार फरार झाल्यापासुन सिडको पोलिसही त्यांचा कसून  शोध घेत आहेत.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.सिडको पोलिस करंत आहेत

कोल्हापूरमध्येही क्वारंटाइन सेटंरमध्ये  एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पनवेल आणि पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्येही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. क्वारंटाइन सेटंरमध्ये  एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी विद्यापीठातील तंत्र शिक्षण विभागातल्या सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तिथे काम करणाऱ्या वॉर्डबॉयनेच हे कृत्य केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला, संबधित वॉर्डबॉयच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर सेंटरमध्ये सुविधा मिळत नसल्यानेही अन्य लोकांनी इथल्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं.  एकाच वेळी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे विलगिकरण कक्षात गोंधळ उडाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!