Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्मशानात जाण्याची वेळ आली तरी लुटारू डॉक्टरांचा लुबाडण्याचा छंद थांबेना, खासगी लॅबने केले 35 लोकांना पॉझिटिव्ह

Spread the love

स्मशानात जाण्याची वेळ आली तरीही अनेक व्यावसायिक लोकांची लुबाडणूक करणे थांबवायचे नाव घेत नाहीत विशेष म्हणजे यामध्ये अनेक डॉक्टरही आपले हात धुवून घेत आहेत .   देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असून  या रुग्णवाढीचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत असल्याने शासनाकडून देशभरात कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब्सना परवानगी देण्यात आले. मात्र या लॅब्सचा लुटारूपणा उघड होत आहे. दिल्ली जवळच्या नोएडामध्ये तर एका खासगी लॅबने 35 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान  त्या सगळ्यांना मात्र  तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरमध्ये काढावे लागले. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार या सर्व जणांना ताप, थंडी, कफ, सर्दी अशी लक्षणे होती. ते सर्व जण खासगी डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी त्या सगळ्यांना कोविड-19ची चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या सगळ्यांनी चाचणी केली ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर  त्या सगळ्यांचे सॅम्पल्स जेव्हा National Institute of Virology ला पाठविण्यात आले ते सगळे निगेटिव्ह आले आहेत. पण तोपर्यंत त्या सगळ्यांना तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरला ठेवण्यात आले होते  शिवाय  त्यांना मानसिक त्रास झाला तो वेगळाच. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या संबंधित लॅब विरुद्ध FIR नोंदविण्यात आला असून अन्य सहा लॅब्सला नोटीस पाठवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून  गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. तर, दुसरीकडे आत मृतांचा आकड्यात सर्वात जास्त वाढ झाली. गेल्या 24 तासांत तब्बल 357 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्यावर गेला आहे. ही चिंतेची बाब असली तरी एक दिलासादायक बातमीही आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!