Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusEffect : रस्त्यावर थुंकला म्हणून झालेल्या मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यू… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभरात कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली असून एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे माहित होताच त्या व्यक्तीवरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबियांवरच लोक बहिष्कार टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. राजधानी दिल्लीत गाडीचा ड्रायव्हर थुंकल्याने झालेल्या भांडणात चालकाचा  मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. कोरोना  व्हायरसचा प्रसार हा थुंकल्यामुळे किंवा तोंडातून निघणाऱ्या तुषारांवाटे सगळ्यात जास्त होतो हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे तोंडावर मास्क लावा, थुंकू नका असं वारंवार सांगितलं जात असतानाही लोकांना या सवयी अद्याप लागत नाहीत मात्र अजुनही लोकांच्या सवयी जात नाहीत. त्यामुळेच अनेकांना कटू प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे तर या घटनेत या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Advertisements

याबाबतची अधिक माहिती अशी कि, दिल्लीतल्या थाना मंदिर मार्ग परिसरात एक गाडी थांबलेली होती. त्यावेळी तिथे काही तरुणही उपस्थित होते. गाडीचा चालक थुंकल्याने तिथे उभे असलेल्या एका इंजिनिअर तरुणाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान भांडणात झालं आणि भांडणातून जोरदार हाणामारी झाली. त्या हाणामारीत गाडीच्या चालकाचा  मृत्यू झाला. या मारहाणीत चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा श्वास कोंडला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!