Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffectWorld : ब्राझील सरकारचा मृतांची आकडेवारीबाबत घेतला धक्कादायक निर्णय

Spread the love

कोरोनाच्या संसर्गाने मोठ्या संकटात सापडलेल्या ब्राझीलमध्ये मृतांची संख्या वाढत आहे. दरम्यान करोनाबाधितांची संख्या आणि आजारामुळे होणारे बाधितांचे मृत्यू यांची संख्या जाहीर न करण्याचे आदेश ब्राझीलच्या सरकारने दिले असल्याचे वृत्त आहे. ब्राझीलच्या सरकारी संकेतस्थळावरून एकूण करोनाबाधित आणि मृतांची संख्या यांची आकडेवारी काढण्यात आली असून आता फक्त मागील २४ तासांची माहिती देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर, जवळपास सलग चार दिवस एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. जगामध्ये सर्वाधिक करोनाबाधितांच्या संख्येत  अमेरिका पहिल्या तर ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी ट्विटवरून ब्राझीलची करोनारुग्णांची आकडेवारी ब्राझीलमधील वस्तुस्थिती दर्शवत नसल्याचे म्हटले आहे. ब्राझीलमध्ये करोनामृत्यूंचा आकडा ३४ हजार आणि ६ लाख १५ हजार कोरोनारुग्ण नोंदवण्यात आले होते. ब्राझीलमधील आकडा तेथील आरोग्य यंत्रणा अधिक दाखवित असल्याचे बोल्सोनारो यांचे म्हणणे असून त्यांचे आणि तेथील आरोग्य यंत्रणेचे सारखे खटके उडत आहेत.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या या निर्णयाचा स्थानिक माध्यमांनी आणि संसदेतील विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. ब्राझीलमध्ये अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक मृतांच्या संख्येची नोंद करण्यात आली आहे. लॅटिन अमेरिकेत ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये करोना संसर्गाचा दर अधिक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लॅटिन अमेरिकेत एकूण करोनाबाधितांपैकी १५ टक्के रुग्ण या खंडातील आहेत. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जगभरात चार लाखांवर रविवारी पोहोचला. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात किमान ६९ कोटी लोक कोरोनाग्रस्त आहेत. मृतांमध्ये अमेरिकेचे नागरिक सर्वाधिक असून सुमारे १ लाख दहा हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपात पावणेदोन लाखांच्या आसपास करोनामृत्यू आहेत. काही तज्ज्ञांच्या मते ही आकडेवारी आणखी मोठी आहे. हॉपकिन्स विद्यापीठातील आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इटली आणि स्पेनमध्ये मिळून साठ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!