Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पेट्रोल -डिझेल आणखी महागणार

Spread the love

देशभर कोरोनाचे वातावरण असल्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाचे दरही ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. दरम्यान, पेट्रोलिअम कंपन्यांनी यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. १६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल करण्यात आला.

दरम्यान काही राज्यांनी  महसूलात वाढ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरी वॅट अथवा सेसच्या दरात बदल केल्यानं गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती  तर मे महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली  होती. त्यानंतर पेट्रोलवरी उत्पादन शुल्क वाढून २२.९८ रूपये प्रति लीटक आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून १८.८३ रूपये प्रति लीटर करण्यात आले होते. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यानं कच्च्या तेलाच्या किंमतीत  घसरण होऊनही नागरिकांना त्याचा  फायदा मिळाला नव्हता. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या होणाऱ्या दरातील बदलांवर निश्चित केले जातात. कारण भारतात तब्बल ८० टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते.

असे असतील नवीन दर

मुंबई – पेट्रोल ७८. ९१ रूपये आणि डिझेल ६९.७९ रूपये

नवी दिल्ली – पेट्रोल ७१.८६ रूपये आणि डिझेल ६९.९९ रूपये

गुरूग्राम – पेट्रोल ७१. ६८ रूपये आणि डिझेल ६३.६५ रूपये

चेन्नई – पेट्रोल ७६. ०७ रूपये आणि डिझेल ६८.७४ रूपये

हैदराबाद – पेट्रोल ७४. ६१ रूपये आणि डिझेल ६८.४२ रूपये

बंगळुरू – पेट्रोल ७४. १८ रूपये आणि डिझेल ६६.५४ रूपये

आपलं सरकार

Click to listen highlighted text!