AurangabadNewsUpdate : कन्टेन्मेंट झोनसाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती , कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारे आवागमन बुधवार पर्यंत पूर्णतः बंद

औरंगाबाद शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारी आवागमन बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंन्टेनमेंट झोनमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
औरंगाबाद शहरात कोविड-19 चा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून यावर प्रभावी नियंत्र्ण आणणे गरजेचे आहे. यासाठी औरंगाबाद महानगर पालिकेने कन्टेन्मेंट झोनमध्ये शासनाच्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने कन्टेंन्मेंट झोन घोषित केलेले आहेत. या कन्टेंन्मेंट झोनमध्ये शासनाच्या सुचनांचे पालन होणे आवश्यक आहे. या करिता औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कन्टेंन्मेंट झोन निहाय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे.
यामध्ये सिल्कमिल कॉलनीसाठी डॉ. विजयकुमार फड, अपर विभागीय आयुक्त, समतानगरसाठी शिवानंद टाकसाळे, अपर विभागीय आयुक्त, किले अर्कसाठी वामन कदम, उप आयुक्त, संजयनगर आणि मुकुंदवाडीसाठी श्रीमती सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी, पुंडलिकनगरसाठी सोहम वायाळ, नोंदणी उपमहानिरीक्षक, आसोफिया कॉलनीसाठी श्रीमती संगिता चव्हाण, उपजिल्हाधिकारी, भिमनगर आणि भावसिंगपुरासाठी श्रीमंत हारकर, उपसंचालक, पर्यटन विभाग, रामनगरसाठी शिवाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त, कैलासनगर आणि बायजीपुरासाठी राजाभाऊ कदम, तहसिलदार, बेगमपुरासाठी श्रीमती प्रगती चौंडेकर, जयभिमगर आणि नुर कॉलनीसाठी पांडुरंग कुलकर्णी, उप आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या कन्टेंन्मेंट झोनला दिवसातून चार वेळा भेट द्यायची आहे शिवाय इतर दोन कन्टेंन्मेंट झोनला देखील भेट द्यायची आहे. भेटी दिलेल्या कन्टेंन्मेंट झोनमध्ये शासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत संबंधित यंत्रणेस सूचना करण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.