AurangabadNewsUpdate : बुद्ध पौर्णिमा,राजर्षी शाहू महाराज स्मृती दिन, तसेच नृसिंह जयंती निमित्त आयोजित मोफत डायलिसिस शिबिर

औरंगाबाद : लॉयन्स मिडटाउन मेडिकल ट्रस्ट अंतगर्त मिडटाउन लायन्स डायलेसिस सेन्टर येथे बुद्ध पौर्णिमा राजर्षी शाहू महाराज स्मृती दिन तथा नृसिंह जयंती निमित्त मोफत डायलिसिस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी १५ डायलिसिसचे रुग्ण लाभान्वित झाले. या शिबिराचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती प्रितीश चटर्जी यांचे हस्ते करण्यात आले ,या प्रसंगी लायन्स मिडटाउन मेडिकल सर्विस ट्रस्ट के अध्यक्ष महावीर पाटनी , लायन्स चे अंतराष्ट्रीय संचालक डॉ नवल मालू,लायन्स क्लब चे विभागीय अध्यक्ष रश्मी नायर लॉयन्स क्लब एंजल्स च्या अध्यक्ष अनिता दंडगव्हाळ, कोषाध्यक्ष तृप्ती चॅटर्जी,सेन्टर चे उपाध्यक्ष अनिल मुनोत,संचालक नितीन संकलेचा,अग्रवाल पाइप्स चे मुकुल अग्रवाल इत्यादी ची उपस्थिति होती.
प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक ट्रस्ट चे अध्यक्ष महावीर पाटणी यानी केले ,, या प्रसंगी बोलताना डॉ नवल मालू यानी लायन्स इंटरनॅशनल,लायन्स परिवार औरंगाबाद आणि शासनाच्या सहकार्याने लवकरच किडनी ट्रांसप्लांट हॉस्पिटल सुरु करण्यासाठी आपल्या भावना वक्त केल्या.लॉयन्स क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाउन अन्तर्गत सुरु असलेल्या या अत्यंत महत्वपूर्ण डायलेसिस प्रकल्प रुग्णासाठी जीवनदायी ठरत आहेत त्या बदल ट्रस्ट च्या सर्व पदधिकार्याचे अभिनन्दन केले तसेच शासना तर्फे राबिवन्यात येणाऱ्या महात्मा फुले योजेने अन्तर्गत या ट्रस्ट ला सम्पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले लॉयन्स एंजेल्स च्या अध्यक्ष अनिता दंडगवाल यानी ही आपल्या भावना व्यक्त केल्या व मिडटाउन क्लब तर्फे राबविन्यात येणाऱ्या प्रकल्पा चे कौतुक केले आणि या कार्यसाठी आर्थिक सह्ययोग ही केला ,या प्रसंगी प्रितेश चैटर्जी यानिहि मिडटाउन डायलीसिस द्वारा सुरू असलेल्या या जान सेवा च्या कार्यला सम्पूर्ण पने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले ,कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ सतीश सुराणा यानी केले तर कार्यक्रमाचे आभार नितीन संकलेचा यानी मानले अशी माहिती ट्रस्ट चे प्रसिद्धि अधिकारी डॉ सतीश सुराणा यानी दिली