#CoronaAurangabad #CurrentNewsUpdte : औरंगाबाद शहरात ८ व्या कोविड रुग्णाचा मृत्यू, 11 जणांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णास 27 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी 6.20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 11 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोविड 19 आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोविड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोविड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!