#CoronaVirusUpdate : कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले, गेल्या १४ आणि २८ दिवसात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही…
In last 28 days, 15 districts have had no new case. Till date, there are 80 districts in the country that have reported no new cases in last 14 days: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry https://t.co/QemuiutRSn
— ANI (@ANI) April 24, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी २३,०७७ वर पोहचलीय तर आत्तापर्यंत देशातील ७१८ जणांनी आपले प्राण कोविड १९ मुळे गमावले आहेत. देशातील ४७४९ जणांवर उपचार यशस्वी ठरल्याचीही माहिती देण्यात आलीय. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी १७,८१० रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत १६८४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलीय. देशाचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २०.५७ टक्के असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या २८ दिवसांत १५ जिल्ह्यांतून कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या १४ दिवसांत एकही नवीन रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांची संख्या ८० वर पोहचलीय. गृहमंत्रालयानं आज चार अतिरिक्त आंतर-मंत्रालय टीम गठीत केल्यात. या अगोदर केंद्राकडून ६ टीम्स गठीत करण्यात आल्या होत्या. या प्रत्येक टीमचं नेतृत्व अतिरिक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलंय. अहमदाबाद, सूरत, हैदराबाद आणि चेन्नईसाठी या टीम गठीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिलीय.
Apart from 6 Inter-Ministerial Central Teams (IMCT) constituted earlier, Home Ministry today constituted four additional IMCTs, each headed by an Additional Secretary – level officer, to Ahmedabad, Surat, Hyderabad & Chennai: Punya Salila Srivastava, Union Home Ministry #COVID19 pic.twitter.com/86gb1rCule
— ANI (@ANI) April 24, 2020
दरम्यान जे भाग हॉटस्पॉट नाहीत तिथं काही प्रमाणात सूट देण्यात आलीय. काही ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण आणि उद्योगांसंबंधीत चुकीच्या समजुती होत्या. यासंबंधी गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना एक पत्रंही धाडलंय. कोणत्याही फॅक्टरीमध्ये संक्रमण झालं तर मालकांना शिक्षा होणार नाही, असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय. नागरिकांपर्यंत माहिती योग्य पद्धतीने पोहचेल याची काळजी राज्यांनी घ्यावी, असंही केंद्रानं म्हटले आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे संचालक डॉ. सुजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ९ दिवसांवर पोहचलाय. त्यामुळे, करोनावर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी ठरतोय, हे लक्षात येतं.