Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : PuneUpdate : दिलासादायक : गड आला पण सिंह गेला, एकाच कुटुंबियातील १५ लोक बरे होऊन घरी गेले…

Spread the love

पुण्यात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना रुग्ण बरे होत असल्याच्या दिलासादायक बातम्या पुढे येत आहेत. अशीच एक दिलासादायक बातमी म्हणजे पुण्यात मंगळवारी एका कुटुंबातील त्यांचा करता पुरुष निमोनियामुळे गेला असला तरी त्यांच्या घरातील १५ आणि इतर ५ नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्खे कुटुंब हादरून गेले होते. या सर्वांना लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते.  हे सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले आणि  डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला जिवदान मिळालं अशी भावना या लोकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे या मंडळींमध्ये ३ वर्षांच्या मुलीपासून ते ९० वर्षांच्या आजींपर्यंत अशा तीन पिढ्यांचा समावेश होता.

दरम्यान या कुटुंबातल्या एका सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितलं की, सुरुवातीला आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले,  पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू इस्पितळात नेले, मात्र त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो,  २० पैकी ८ जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो. आम्हाला लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो.

या विषयी अधिक माहिती देताना सिंम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नटराजन माहिती देताना म्हणाले कि ,   लवळे येथील सिंम्बायोसिस रुग्णालयात १५५ रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले १५ रुग्ण ८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १४ दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. ९२ वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील 3 वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्णही होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!