Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : ताजी बातमी : औरंगाबाद शहरात ३ नवीन कोरोना रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या ३५

Spread the love

Update 3.40 :

औरंगाबाद : कोविड 19 चा संसर्ग झालेल्या तीन नवीन कोरोना रुग्णांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे या आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 35 झाली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर जुन्या दोन रुग्णांची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.
मिनी घाटीमध्ये एकूण 47 रुग्णांची आज तपासणी झाली. त्यापैकी 24 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 36 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले आहे. 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आताच्या नवीन तीन रुग्णांसाह मिनी घाटीमध्ये सध्या 15 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगिकरण कक्षात, दोन कोरोना बाधितांवर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या 28 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!