Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdte : औरंगाबाद शहरात तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह , एकूण संख्या २८ तर राज्यभरात १६५ नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

जगभरात आणि देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून सर्वत्र खबरदारी घेतली जात असली तरी राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं तीन हजारचा टप्पा ओलांडला असून औरंगाबाद शहरात आणखी तीन  रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या २८ झाली आहे. . मागील १८-२० तासांत राज्यभरात तब्बल १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ३०८१ झाली आहे.


तीन नवीन रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; रुग्ण एक घाटीत, दोन मिनी घाटीत

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल रुग्णांपैकी दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर घाटीत प्रकृती गंभीर असलेल्या  65 वर्षीय महिला रुग्णाचाही अहवाल  पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले. घाटीतून मिनी घाटीस 13 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. आज प्राप्त तपासणी अहवालामध्ये चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या एका अन्य रुग्णाचा देखील समावेश आहे. त्या व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांच्यावर मिनी घाटी येथे उपचार सुरूच राहतील.  आज मिनी घाटीस प्राप्त अहवालांपैकी उर्वरित 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 56 अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचेही मिनी घाटीचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.


राज्यभरात नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये एकट्या मुंबईतील १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यात १९ रुग्ण वाढले आहेत. औरंगाबाद शहारत ३, नागपूर महापालिकेच्या हद्दीत १० रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात एक जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई व वसई-विरारमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावत आणखी चार रुग्ण सापडले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अहमदनगर, चंद्रपूर व पनवेल शहरात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!