Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : मोदींशी मतभेद जरूर आहेत पण हि वेळ एकोप्याची , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या या अपेक्षा…

Spread the love

देशातील एकूण निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, सरकारनं गरीबांसाठी आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. सध्या आपण एका गंभीर स्थितीमध्ये आहोत, अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र यायला हवं, असेही त्यांनी म्हटले. यावेळी, राज्यांच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे  काम राज्यांना ताकद देण्याचे आहे, राज्यांना  पैसे पुरवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या शक्तीचा योग्य पद्धतीनं वापर करायला हवा. यासाठी राज्यांना अधिक अधिकार देण्याची गरज आहे’, असेही म्हटले आहे. केंद्राकडून राज्यांना या वेगानं आर्थिक मदत पुरविली जाण्याची गरज होती त्या वेगानं ही मदत पोहचताना दिसत नाही. आज गोदामांमध्ये धान्य पडून आहे, ते गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. न्याय योजनेला लागू करून गरीब नागरिकांना आर्थिक मदत पुरवण्याची गरज आहे. भले तुम्ही न्याय योजनेचं नाव बदला परंतु, हे काम नक्की करा, अशी सूचनाही राहुल गांधी यांनी सरकारला केलीय.

आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधी यांनी एका जिल्ह्यात किमान ३५०  टेस्ट व्हाव्यात, देशात कोरोनाचं खूप मोठं संकट असले तरी लॉकडाऊन हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यावरचा उपाय नाही. संकाटाच्या काळात एकत्र येणं गरजेचं असून टेस्टिंग क्षमता वाढवण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास भारताला मोठा फायदा होईल. यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गरिबांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची गरज आहे. याशिवाय गरजू लोकांपर्यंत अन्न पुरवठा व्हायला हवा. कोरोनामुळे देशात सध्या आणीबाणीसारखी स्थिती आहे. केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला ताकद देणं महत्त्वाचं आहे. हे युद्ध आता खऱ्या अर्थानं सुरू झालं आहे त्यामुळे आताच आपण विजय साजरा करून चालणार नाही. या संकटकाळात सर्व बाजूनं विचार करणं गरजेचं आहे. लॉकडाऊमुळे मजुरांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान आणि देशाला बसलेला आर्थिक फटका याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या महासंकटाविरोधात लढण्यासाठी विविध स्तरावर नियोजन करायला हवं.

देशात टेस्टिंग किट्सची मोठ्या प्रमाणात कमकरता आहे. ही लढाई मोठी आहे त्यामुळे विचार करून लढणं गरजेचं आहे. त्यासाठी रँडम टेस्टींग करणं गरजेचं आहे. मजूर आणि गरिबांच्या खात्यात थेट पैसे द्या. छोट्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन आणि बेरोजगारीचं संकट ओढवू नये यासाठी नियोजन करण्यात यावे . मोदींजींच्या अनेक गोष्टी मला आवडत नाहीत मात्र आता भांडण्याची ही वेळ नाही. एकत्र येऊन महासंकटाविरोधात लढण्याची वेळ आहे. शेवटी घाबरण्याचं कारणं नाही पण एकत्र येऊन लढण्यात बळं आहे. आपण सहज कोरोनाला हरवू शकतो पण आपापसोत भांडत राहिलो तर कोरोनावर यश मिळवणं कठीण होईल असेही राहुल गांधी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!