Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुंबई , पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव…

Spread the love

मुंबई , पुणे नंतर मालेगावात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढतच असून गुरुवारी रात्री ५ जणांना लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळं मालेगावतील करोना बाधितांचा आकडा चोवीस तासात ९ वर पोहोचला आहे. त्यापैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. करोनाचे संशयित व बाधित वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारपर्यंत केवळ २ करोना रुग्ण होते. गुरुवारी सकाळी त्यात अचानक वाढ झाली. मालेगावात ५ जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. प्रशासन सतर्क असताना देखील रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा ५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने २४ तासात करोनाबाधित रुग्णांची संख्या ९ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या ५ रुग्णामध्ये ४ पुरुष व १ महिला आहे. यातील एक जण चांदवड येथील २६ वर्षीय तरुण आहे. तर मालेगाव पूर्व भागातील अपना सुपर मार्केट परिसरातील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसंच, नयापुरा भागातील ५८ व ६१ वर्षांचे दोन रुग्ण आहेत. एक रुग्ण मोमीनपुरा येथील दुकानदार असून त्याचे वय ३७ वर्ष आहे. मोमीनपुरा भागातील रुग्ण दिल्लीत प्रवास करून आल्याचे समोर आले आहे. त्याचे मरकज कनेक्शन असल्याची शक्यता व्यक्त होते आहे. उर्वरीत चार रुग्णांनी देशात किंवा विदेशात प्रवास केल्याचे समोर आले नाही.   हे पाचही रुग्ण बुधवारी( दि ८) सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते. मालेगावतील सर्व ९ करोना रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यातही मुस्लिमबहुल पूर्व भागातून बहुतांशी रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. पालिका प्रशासनाने करोना रुग्णांच्या संपर्कात आलेले कुटुंबीय व अन्य लोक यांचा शोध सुरू केला आहे. प्रलंबित अहवालाची संख्या लक्षात घेता करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!