Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdates : औरंगाबाद शहरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण , एकूण १५ रुग्णांवर चालू आहेत उपचार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी किराडपुरा भागातील 49 वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर 29 जणांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्याने  घरातच अलगिकरणात राहण्याचा वैद्यकीय सल्ला त्यांना दिल्याचे रुग्णालयाचे डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

Advertisements

आज एकूण 39 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी)  पाठविलेले आहेत. त्यातील काल आणि आजचे मिळून 44 जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. 19 तपासणी अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 42 रूग्ण देखरेखीखाली आहेत, तर उपचारानंतर 43 रुग्णांना सुटी देण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!