Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि ‘लॉकडाऊन’ हीच लस तूर्त कोरोनाला थांबवू शकते : डॉ . हर्षवर्धन

Spread the love

देशातच नव्हे तर जगभरात कोविड १९ वर जोपर्यंत लस उपलब्ध होणार नाही तेव्हापर्यंत ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि ‘लॉकडाऊन’ ही दोन हत्यारंच ‘सामाजिक लस’ म्हणून काम करतील, असे  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. ते कोविड १९ शी लढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘बेने युनिव्हसिटी’च्या ऑनलाईन इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये बोलत होते. पुढच्या आठवड्यापर्यंत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १० लाख पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटस) उपलब्ध होतील. भारतातील ३० उत्पादक हे पीपीई बनवणार आहेत. त्यांचा पुरवठा सर्व राज्यांना गरजेनुसार करण्यात येईल. त्याशिवाय ४८ हजार व्हेन्टिलेटर्सचीही ऑर्डर देण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

भारताने कोविड १९ ला हरवण्यासाठी  संपूर्ण तयारी केली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर इतर देशांहून भारताची स्थिती नक्कीच चांगली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. करोना व्हायरसशी लढतानाच खोट्या माहितीसोबत आणि अफवांसोबत लढाई हेदेखील मोठं आव्हान आहे. नागरिकांनी योग्य आणि खात्रीलायक सूत्रांकडूनच करोना विषाणूबद्दल माहिती घ्यावी, असंही त्यांनी आवाहन केलंय. ‘बेनेट युनिव्हर्सिटी’नं गुरुवारी भारताची पहिली ऑनलाईन कॉन्फरन्स आयोजित करून आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांना अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर एका मंचावर मांडल्या. युनिव्हर्सिटीच्या ‘टाईम्स स्कूल ऑफ मीडिया’नं या ग्लोबल ऑनलाईन कॉन्फरन्स ‘कोविड १९ :फॉलआऊट ऍन्ड फ्युचर’मध्ये कोविड १९ शी निगडीत अनेक मुद्द्यांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी चर्चा केली.

दरम्यान दि . ७ जानेवारी रोजी चीननं संपूर्ण जगाला आणि ‘डब्ल्यूएसओ’ला कोविड १९ बद्दल माहिती दिली. त्यानंतर ८ जानेवारी रोजी आम्ही सर्व तज्ज्ञांची बैठक बोलावली. ‘डायरेक्टोरेट जनरल हेल्थ सर्व्हिसेस’ने  पुढाकार घेतलेल्या या बैठकीला ‘डब्ल्यूएसओ’देखील आमंत्रित करण्यात आले  होते , असं यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले . यानंतर चीनची परिस्थिती पाहता डोळेझाक करून किंवा थांबून चालणार नव्हते. त्याच दिवसापासून आम्ही तयारी सुरू केली. कोलकता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोचीन, मुंबई, दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात आली. आज सात लाखांहून अधिक जण देखरेखीखाली आहेत. स्क्रिनिंग, सर्व्हिलन्स आणि ऍडव्हायजरी फॉर्म्युले पाळले जात आहेत. याशिवाय बॉर्डरवर पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला तेव्हा स्क्रिनिंगची संख्या वाढवण्यात आली. परिस्थिती चिघळलेल्या देशांत शिकणाऱ्या भारतीय तरुणांचीही योग्य वेळी सुटका करण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!