Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दोन कोटींची खंडणी मागणार्‍या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराला बेड्या

Spread the love

औरंगाबाद – कापूस व्यापार्‍याला फोनवरुन दोन कोटींची खंडणी मागणार्‍या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यातून जेरबंद केले.त्याच्या ताब्यातून २०हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.
शंकर उर्फ आबा दामोदर शेंडगे रा. बाग पिंपळगाव ता.गेवराई जि. बीड असे अटक आरोपीचे नाव आहे. शेंडगे ने सिडको एन ३ परिसरातील दिनेश सेवकराम मुछाला यांना १७फेब्रूवारी आणि ६मार्च रोजी फोनवरुन दोन कोटी रु. खंडणी मागितल्याची तक्रार मुछाला यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. मुछाला यांचा डोंगरगावच्या पुनित एंटरप्राईजेस आणि गेवराई येथे मनजित काॅटन या फर्म सोबंत भागिदारीचा व्यवसाय आहे.ते शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करतात. वरील तक्रार प्राप्त होताच पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पीएसआय भगतसिंग दुलंत, पोलिस कर्मचारी सुधाकर दौड, नामदेव शिरसाठ , दिपेश नागझरे, योगेश तरमाळे यांच्यावर आरोपी शोधण्याची जबाबदारी दिली.पीएसआय दुलंत यांनी जीआयएस पध्दतीची मदत घेत शेंडगे ला ताब्यात घेत चौकशी केली असता. आरोपीने खंडणी मागितल्याची कबुली दिली. पुढील कारवाई साठी पोलिस निरीक्षक फुंदे यांनी आरोपीला सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!