Aurangabad Crime : पत्ता विचारण्याचा बहाणा करून , शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – जवाहरकाॅलनी परिसरात संध्याकाळी ५ च्या सुमारास मैत्रीणी सोबंत फिरायला गेलेल्या शिक्षिकेचे १ तोळ्याचे मंगळसूत्र दोन भामट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करंत हिसकावले.व पसार झाले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संध्या वासूदेव डबीर (५७) रा.पार्वतीनगर उल्कानगरी असे फिर्यादीचे नाव आहे. डबीर या मैत्रीणी सोबंत (शुक्रवारी ) संध्याकाळी फिरायला जाण्यास निघाल्या इतक्यात विनाक्रमांकाच्या मोटरसायकलवर दोन भामटे त्यांच्या जवळ आले व पत्ता विचारण्याचा बहाणा करंत मोटरसायकलवर मागे बसलेल्या भामट्याने डबीर यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मॅंगळसूत्र हिसकावले पण प्रसंगावधान दाखवत डबीर यांनी चोरट्याचा हात जोरात दाबला.व अर्धे मंगळसूत्र डबीर यांच्याकडे राहिले व अर्धे घेऊन पळाला.या प्रकरणी पुढील तपास जवाहरनगर पोलिस करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!