Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बनावट बिलाआधारे सेल्समनला गंडा

Spread the love

औरंगाबाद : बनावट बिलाआधारे सेल्समनला पुण्यातील भामट्याने एक लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. समीर मोहम्मद इनामदार मोहम्मद हुसेन इनामदार (रा. नवाजीश अपार्टमेंट, मिठानगर, कोंडाबा खुर्द, पुणे) असे फसवेगिरी केलेल्या भामट्याचे नाव आहे.
जटवाडा रोडवरील नासेर खान हबीब खान (३८, रा. फरहतनगर) यांच्या एका मित्राने कॉस्मेटिकचा व्यवसाय सुरू करुन देतो असे सांगत त्यांना पुण्याला नेले. तेथील एबीसी इंडिया कंपनीचा मालक समीर इनामदार याच्याशी ओळख करुन दिली. त्यानंतर दोघांमध्ये व्यवसायाबाबत चर्चा झाली. पुढे २३ नोव्हेंबर २०१९ ते २० जानेवारीदरम्यान नासेर खान यांनी इनामदारच्या बँक खात्यावर आरटीजीएसव्दारे पाठवली. यावेळी कॉस्मेटिकचे साहित्य पाठवतो असे म्हणत इनामदार याने खान यांच्या मेलवर बनावट बिल पाठवले. साहित्य मिळाले नाही म्हणून खान यांनी इनामदारशी संपर्क साधला. यावेळी खान यांनी त्याच्याकडे रकमेची मागणी केली. मात्र, इनामदारने त्यांना पैसे न देता शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यावरुन खान यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत सोमवारी फसवणूकीची तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!