Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्लॉटींगच्या वादातून प्लंबरची हत्या प्रकरण, चौघांना जन्मठेप तर कुख्यात बबलाला जन्मठेपेनंतरही १० वर्षाची सक्त मजुरी , शिक्षा सुनावल्यानंतर “तो ” हसत होता …

Spread the love

औरंंंगाबाद : प्लॉटींगच्या वादातून प्लंबरला तब्बल पाच तास मरण यातना देवून त्याची अत्यंत क्रूरपणे  हत्या करणार्‍या कुख्यात शेख वाजेद उर्फ बबलासह चार जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान बबल्याला जन्मठेप भोगल्यानंतर पुन्हा दहा वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेतील एक लाख रुपये मृताच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणातील दोन आरोपी माफीचे साक्षीदार झाल्याने त्यांची निर्दोेष मुक्तता करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी हि आरोपींना हि शिक्षा सुनावली . विशेष म्हणजे शिक्षा सुनावल्यानंतरही बबल्या न्यायालयात हसत होता, असे दिसून आले.


प्लॉटींगच्या वादातून प्लंबरचा व्यवसाय करणार्‍या शेख जब्बार शेख गफ्फार (वय ३०, रा.आसेफिया कॉलनी, हिलालनगर) यांचा खून केल्या ) या तरूणाचे १६ मे २०१८ रोजी शेख वाजेद उर्फ बबला, बाबा लोली, अलीम, शेख अमजद, सिकंदर व इतर दोघांनी बिस्मीला कॉलनी येथील खामनदीजवळ बेदम मारहाण करून अपहरण केले होते. त्यानंतर शेख जब्बार यांची दौलताबाद परिसरात तब्बल पाच तास मरण यातना देवून त्याची क्रूरपणे हत्या केली होती. शेख जब्बार याची हत्या केल्यानंतर बबलाने त्याचे पोट फाडून मृताचे अवयव काढुन खाल्ले होते. त्यांतर शेख जब्बार यांच्या पोटात दगड टाकून तो मृतदेह पाण्यात फेकला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी शेख वाजेद उर्फ बबलासह त्याच्या टोळीला अटक केली होती. दरम्यान, बुधवारी या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुख्यात शेख वाजेद उर्फ बबलाने यापुर्वी दोन वेळेस न्यायालयाच्या आवारात साक्षीदारांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यामुळे बबलाला न्यायालयात विशेष बंदोबस्तात आणण्यात आले होते.

या प्रकरणी कुख्यात शेख वाजेद शेख असद उर्फ बबला (२५), त्याचा भाऊ शेख अमजद शेख असद उर्फ मोहसीन (२९, दोघे रा. जहांगीर कॉलनी), शेख कलीम उर्फ कल्लू शेख सलीम (२५, रा. आसेफिया कॉलनी) व सय्यद शहाबुद्दीन उर्फ शहाब सय्यद राशेद (२६, रा. बुढीलेन) या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी आज जन्मठेपेची शिक्षा व एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला. बबल्याला जन्मठेप भोगल्यानंतर पुन्हा दहा वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेतील एक लाख रुपये मृताच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या प्रकरणातील सर्व चार आरोपींना न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरवले होते. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद १३ फेब्रुवारी रोजी सरकारी पक्षाने केला होता. त्यानंतर शुक्रवारी अंतिम निकाल देत न्यायालयाने चौघांना शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे बबल्याला ठोठावण्यात आलेली, जन्मठेपेनंतर दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ही या प्रकारची जिल्हा न्यायालयातील पहिली शिक्षा असू शकते, असे सांगण्यात आले.

या प्रकरणात मृत शेख जब्बार शेख गफ्फार याचा भाऊ शेख सत्तार शेख गफ्फार यांनी याबाबत फिर्याद दिली होती. जब्बार ज्यांच्याकडे काम करत होते, ते अझीझ ठेकेदार यांनी फिर्यादीला १७ मे २०१८ रोजी भेटले असता ‘जब्बार हा दोन दिवसांपासून माझी दुचाकी घेऊन गेला, पण कामावर आलेला नाही’ असे सांगितले. फिर्यादीने जब्बारच्या पत्नीकडे चौकशी केल्यानंतर तो हरवल्याची तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, आरोपींनी जब्बारचे अपहरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने अपहरणाची तक्रार दिली. १६ मे २०१८ रोजी आरोपींनी जब्बार यांचा बिस्मिल्ला कॉलनीजवळील खाम नदीच्या परिसरात नेऊन चाकू, कोयता, फावड्याने वार करून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह दौलताबाद परिसरातील मोमबत्ता तलावाजवळील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ नेला. तेथे मृताचे पोट फाडून त्यातील आतडे काढून टाकले व त्यात दगड भरून मृतदेह विहिरीत फेकला. मृताची दुचाकी (जी मुळात ठेकेदाराची होती) पडेगावच्या विहिरीत फेकली. या बाबी तपासात व शवविच्छेदन अहवालावरून निष्पन्न झाल्या.

या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी २१ साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर फिर्यादीतर्फे अॅड. वर्षा घाणेकर-वाघचौरे यांनी काम पाहिले. यामध्ये प्रकरणातील आरोपी व माफीचा साक्षीदार शेख इम्रान उर्फ बाबा लोली शेख करीम (२१, रा. आरेफ कॉलनी) आणि प्रत्यक्षदर्शी महिला साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने चौघांना दोषी ठरवले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून प्रमोद गठाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपाली निकम, एस. एस. खान, भीमराव घुगे यांनी काम पाहिले.

दोषी ठरलेल्या चौघांना न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये सश्रम जन्मठेप व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या २०१ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या ३६४ कलमान्वये दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिने अतिरिक्त सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या ३६५ कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मात्र शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बबल्यास भारतीय दंड संहितेच्या ३०२, २०१ व ३६५ कलमान्वये ठोठावण्यात आलेली शिक्षा एकत्र भोगायची आहे; पण भारतीय दंड संहितेच्या ३६४ कलमान्वये ठोठावण्यात आलेली दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ही जन्मठेप भोगल्यानंतर भोगावी लागणार असल्याचेही न्यायालयाने सुस्पष्ट केले आहे. तर, उर्वरित तिघांना सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.

माफीचा साक्षीदार शेख इम्रान उर्फ बाबा लोली शेख करीम याच्या डोळ्यासमोर संपूर्ण गुन्हा घडला होता. त्याने ती संपूर्ण घटना कुठलीही गोष्ट न लपवता न्यायालयासमोर समाधानकारकरित्या कथन केली. प्रकरणातील उपलब्ध पुरावे, घटना व माफीच्या साक्षीदाराचे सत्यकथन तर्कसंगतदृष्ट्या जुळले आणि त्यावर न्यायालयाचा विश्वास बसला. त्यामुळे न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराला गुन्ह्यात दोषी ठरवून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुन्ह्यात माफी देत निर्दोष मुक्त केले. माफीच्या साक्षीदाराचा प्रस्ताव सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी न्यायालयात सादर केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!