Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आणखी एका महिलेला जाळून फासावर लटकावले , पाच आरोपी फरार , राज्यात महिला जळीताची तिसरी घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्टात गेल्या चार दिवसात महिलेला पेटवून देऊन त्यांचा खून करण्याची आणखी एक तिसरी घटना नवी मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका ५५ वर्षीय महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुर्गंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी महिलेला फासावर लटकावून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मात्र या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने तर्कवितर्क मांडले जात आहे. या प्रकरणातील पाच संशयित आरोपी फरार झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisements

या प्रकरणात मिळालेली माहिती अशी की, पनवेलमधील दुन्द्रे गावात ही धक्कादायक घटना आहे. शारदा माळी असं मृत महिलेचे नाव आहे. मारेकऱ्यांनी शारदा माळी यांना आधी जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्गंधी  पसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना फासावर लटकावून त्यांची निर्घृण हत्या केली, असा आरोप शारदा माळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची पाच संशयित आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यात चार दिवसांत महिलेला जाळून मारण्याची हि तिसरी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!