नववर्ष आणि शौर्य दिनानिमित्त आज शहरात तगडा पोलिस बंदोबस्त

औरंंंगाबाद : भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेला १ जानेवारी रोजी दोन वर्ष पुर्ण होत आहेत. नाव वर्ष दिन आणि शौर्य दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी बुधवारी (दि.१) शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
भिमा कोरेगांव येथे साजर्या होणार्या शौर्य दिनाच्या दिवशी दोन वर्षापुर्वी हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेच्या निमित्ताने शहर पोलिसांच्या वतीने बुधवारी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त – ३, सहाय्यक आयुक्त – ४, पोलिस निरीक्षक ३४, सहाय्यक निरीक्षक/ उपनिरीक्षक – ७५ यांच्यासह शहर पोलिस दलाचे जवळपास ३ हजार ५०० कर्मचारी बंदोबस्त कामी शहरात तैनात राहणार आहेत. शहराच्या विविध भागात ६४ ठिकाणी फिक्स पोलिसांचे फिक्स पॉईंन्ट लावण्यात आले आहेत. तसेच शहरात येणार्या व शहरा बाहेर जाणार्या मार्गावर ६ ठिकाणी चेकपोस्ट उभारून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.