Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीला २० वर्षाची सक्तमजुरी आणि एक लाखाचा दंड

Spread the love

अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने एका खटल्यात जलदगतीने कामकाज चालवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे अवघे सहाच दिवस या खटल्याचे कामकाज चालले.

या खटल्याची अधिक माहिती अशी कि , पारनेर तालुक्यातील इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून एका परप्रांतीय आरोपीला जलदगती न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मनोज हरिहर शुक्ला मूळचा  भरसाळ, गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील आहे याला पास्को कायद्यान्वये शिक्षा आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी अवघ्या २ महिने आणि ६ दिवसांत या खटल्याची सुनावणी पूर्ण केली. दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशात म्हटले आहे. आरोपी मनोज शुक्ला हा कामासाठी पारनेर तालुक्यात आला होता. पीडित मुलीचे आई-वडील नेपाळचे रहिवासी होते.

पारनेर तालुक्यात एका हॉटेलात ते आचारी म्हणून काम करत होते. आरोपी मनोज आणि मुलीचे कुटुंब एकाच चाळीत राहत होते. मे २०१७ मध्ये मुलीची आई घरात काम करत असताना आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले. नंतर तिला स्वत:च्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलगी दिसेना म्हणून तिच्या आईने शोधाशोध केली असता ती मनोजच्या खोलीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मनोजने आतून लावलेली कडी उघडल्यानंतर मुलीला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले. विचारपूस केली असता मुलीने मनोजने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीच्या आईने याप्रकरणी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!