Aurangabad Crime : पतीपासून विभक्त राहणा-या महिलेवर बलात्कार, पैसे दुप्पट करून , लग्नाचेही दाखवले आमिष…

औरंंंगाबाद : पतीपासून विभक्त राहणा-या ३५ वर्षीय तक्रारदार महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना रेल्वेस्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये घडली . या प्रकरणी वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पण तपासामधे गुन्हा उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे उघड झाल्यामुळे हा गुन्हा सोमवारी उस्मानपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. शेख जुबेर शेख अब्दुल अजीज (रा.बीड) असे महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीचे नाव पीडित तक्रारदार महिला गारखेडा परिसरातील रहिवासी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती विभक्त राहत होती. शेख जुबेर याने पीडितेस तुझ्याजवळील पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून तिला रेल्वेस्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये नेवून बलात्कार केला होता. त्यानंतर शेख जुबेर याने पीडितेस वेळावेळी पैसे दुप्पट करून देण्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले होते. पीडितेने लग्नासाठी तकादा लावल्यावर शेख जुबेर हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार करणाNया शेख जुबेरविरूध्द वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी या प्रकरणात पी.एसआय संदीप शिंदे यांना गुन्हा उस्मानपुरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.