Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : भावजयीवर खुनी हल्ला करून त्यानेही केला आत्मघात , पोलिसांकडून मयताविरुद्ध गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

मनोरुग्णाने भावजायीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास वाळुज भागात घडली. या नतर केलेल्या कृत्याचा मनोरुग्णाला पश्र्चाताप झाल्याने कत्तीने स्वता:चा गळा कापून घेतला.यानंतर घाटीत उपचार सुरु असतांना मनोरुग्ण मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या प्रकरणी मयतावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

दत्ता किसनराव चौधरी (३२) असे मनोरुग्णाचे नाव आहे. दत्ता हा मनोरुग्ण होता.वाळूज औद्रोगिक परिसरातील कंपन्यांचे इलेक्र्टीक कामाचे तो कंत्राट घेत असे. गेल्या दोन महिन्यांपासून तो मनोरुग्ण झाला होता.पण त्याच्यावर उपचार करण्याचे सोडून मयत दत्ताला सैलानी बाबा दर्ग्याकडे दोरे गंडे करण्यास कुटुंबिय नेत होते. दरम्यानच्या काळात मयत दत्ताचा आजार बळावला त्यामुळे तो वारंवार तो घरच्या मंडळींना त्रास देतो. १२ डिसेंबर रोजी भाउजाईला सासुचा व बहिणीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे तिने दिर दत्ताच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा त्याने स्वता:च्या पत्नीला बळजबरी बेडरुममध्ये नेले. यावेळी भावजयीने त्याला विरोध केला. त्यावर त्याने वेडाच्या भरात पाठीमागून भावजयीच्या  बरगडीवर कत्तीने वार केला. यात गंभीर जखमी झाल्या हे पाहून दत्ता घाबरला व स्वता:चा गळा त्याच कत्तीने कापून घेतला.

Advertisements
Advertisements

दरम्यान दत्ताबरोबर भाऊजायीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दत्ता उपचार सुरु असतांना मरण पावला त्याच्याविरुध्द भावजयीने दिलेल्या तक्रारीवरुन वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक उंबरे करत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!