Aurangabad Crime : पोलिस निरीक्षक सावंत यांच्या कारवाईवर सतत प्रश्नचिन्ह , चौकशी करणार – पोलिसआयुक्त प्रसाद

औरंगाबाद- गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या बहुतेक कारवाईवर माध्यमांकडून प्रश्नचिन्ह उभे केले जातात या बाबत आपण सखोल चौकशी करु असे स्पष्टीकरण पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिले.
नवरात्रीच्या काळात पकडलेला मोटरसायकल चोर असो, की, पुणे येथील चंदननगर पोलिस ठाण्यातील चोरटा पकडलेला असो किंवा बॅग लिफ्टर ची टोळी पकडण्याची मोठी कारवाई असो अशा बहुतेक कारवायांवर गुन्हेशाखेवर आयुक्तालयातील अधिकारी ,कर्मचारी अंगुली निर्देश करंत असतात. हा प्रकार आपल्या निर्दशनास आला असून याबाबत माहिती घेण्यासाठी मी पोलिसआयुक्तालयातील काही अधिकार्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील सहा बॅग लिफ्टर गुन्हेशाखेने पकडून त्यांच्या ताब्यातून ५२ हजार ७०० रु. रोख आणि इतर मुद्देमाल जप्त केला होता. त्यातील आरोपींना १६ डिसैंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे त्यातील एक आरोपी अशोक कोतम याने पैठण यैथे एका घरात खड्डा करुन दडवून ठेवलेले १लाख ५०हजार रु.काही तासांत गुन्हे शाखेला काढून दिले. या कारवाईचीमाहिती अधिकृतरित्या माध्यमांना दिल्यानंतर पुन्हा याबाबत काही माध्यमांकडे रिकव्हरी केलेल्या रकमेबाबत साशंकता व्यक्त केली जाऊ लागली. हा सर्व काय प्रकार आहे. की माध्यमांच्या खांद्यावर बंदुक ठेवून कोणी सावंत यांना टारगेट करंत आहे याचाही खुलासा लवकर केला जाईल असे शेवटी प्रसाद म्हणाले.