Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर काय बोलल्या खा. सुप्रिया सुळे ?

Spread the love

काँग्रेस -राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या भाजपावरील असंतोषाचा चांगला वापर करीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थपणा करून एक वेगळा प्रयोग केल्यांनतर शरद पवार यांच्या बोलण्याला मोठी किंमत आली आहे. त्यामुळे  भविष्यात राष्ट्रवादीचा डाव काय असेल आणि भाजपबरोबर ते युती करू शकतात हा असा थेट प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जेंव्हा विचारला तेंव्हा त्यांनी स्पष्ट नकार किंवा होकार दिला नसल्याचे दिसून आले. या प्रश्नाचे अतिशय सावध उत्तर देत त्या म्हणाल्या कि , “जे पक्षाचं मत असेल, तेच माझं असेल. मी पक्षाची अनुशासित शिपाई आहे. त्यामुळे माझं वेगळं मत नसेल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या भेटीत नेमकं काय झालं याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी सोमवारी केल्यानंतर न्यूज १८ या वृत्त वाहिनीशी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या विषयावर म्हणाल्या कि ,   “अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीच भाजपकडे गेले नव्हते,”  “जे झालं तरे आमच्या पक्षाचं आणि आमच्या कुटुंबाचं वैयक्तिक प्रकरण होतं”.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत,  नरेंद्र मोदींनी सुप्रियाला मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. त्याविषयी सुप्रिया यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, “दोन मोठ्या नेत्यांची ही भेट होती. त्या भेटीत मी नव्हते. पंतप्रधानांनी मला मंत्रिपदाची ऑफर देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.”पंतप्रधानांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.  भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का, यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला नाही.

गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला. यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीची. या भेटीत नेमकं काय झालं? पंतप्रधान काय म्हणाले? हा पवारांचाच डाव होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिली आहेत. अर्थात त्यांच्या या माहितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केल्याशिवाय दुसरी बाजू समोर येणार नाही . येत्या ६ आणि ७ तारखेला मोदी पुणे दौऱ्यावर आहेत . अर्थात या दौऱ्यात ते  भाष्य करतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी बोलताना पवारांनी म्हटले होते कि , पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता, ते असेही म्हणाले होते  कि , “पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो.” आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला असं पवार यांनी सांगितलं.

या सर्व पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यालाही तितकेच महत्व आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!