औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला पालकांची मारहाण, मुलगी प्रियकरासोबत फरार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – अल्पवयीन मुलीने शेजारच्या मुलावर प्रेम केल्यामुळे चिडलेल्या आई वडलांनी मारहाण करताच मुलगी प्रियकरासोबंत पळून गेल्याचा गुन्हा वेदांतनगर पोलिसठाण्यात मंगळवारी दाखल झाला.
बन्सीलाल नगरातील एका अल्पवयीन मुलीचे शेजारच्या मुलासोबंत प्रेम जुळले.

Advertisements

हा प्रकार आई वडलांना समजताच तिला घरात बेदम मारहाण झाली. त्यामुळे चिडलेल्या मुलीने आई वडलांच्या विरोधात सोमवारी शारिरीक छळ करंत असल्याची तक्रार दिली. ही घटना तिच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलीला आई वडलांच्या विरोधात तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. तिने तक्रार मागे घेतलीही पण घरी जाण्याची हिम्मत होत नव्हती हा प्रकार प्रियकराला सांगितल्यावर त्याने तिला पळवून नेले.

Advertisements
Advertisements

या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन प्रियकराविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिसनिरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!