Aurangabad : माथाडी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी काळे झेंडे दाखवून क्रांती चौकात निदर्शने

जिल्ह्यातील एकाही शासकीय गोदामात पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता गृह ( संडास ) नाही, विश्रांती गृह नाही….. सर्वत्र तात्काळ व विनाविलंब व्यवस्था करा….., माथाडी कामगारांना गुलामा सारखे (१६ – १६ तास काम करून घेणे…. ) वागवू नका…… कायद्या प्रमाणे ८ तास काम आणि अधिक कामाचा कायद्या प्रमाणे दुप्पट मोबदला द्या……. कामाचे वेळापत्रक ठळक अक्षरांत लावा……, सर्वत्र फक्त माथाडी मंडळात नोंदीत माथाडी कामगारांकडूनच काम करून घ्या…., भाजी मंडईत माथाडी कायदा लागू करा….. गुंडगिरी करून काम करणाऱ्यावर कठोर कारवाई करा………., मोंढ्यात काम करणाऱ्या माथाडी कामगारांना बाजार समिती व माथाडी मंडळाने लायसेन्स द्या…….., माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून, जे त्यास विरोध करतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करा आदी विविध मागण्यांसाठी भर दिवाळीत , माथाडी कामगारांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, हिंद मजदूर सभे चे वतीने, कायद्याचे चौकटीतील सर्व प्रश्न सोडविले जावेत म्हणून, मागील महिन्यात माथाडी मंडळ व जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात आले तेंव्हा, सर्व प्रश्न महिन्याभरात सोडविले जातील असे लेखी आश्वासन दिल्यावरच बेमुदत उपोषण स्थगित केले.मात्र महिना उलटून गेल्यावरही एकही प्रश्न मार्गी लागला नाही,म्हणून माथाडी कामगार ना निदर्शने करावी लागली…..
बेकायदेशीर पणे काढलेल्या सर्व माथाडी कामगारांना पोलीस संरक्षणात कामावर पाठविणे, नोंदीत माथाडीना कायद्याचे संरक्षण देणे, वर्षानुवर्षे माथाडी चे काम करणाऱ्यांची नोंदणी करणे, मालकाने कमी केलेल्या पगाराची वसुली करणे, कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे, शासकीय गोदामात – कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा ( पाणी – स्वच्छता गृह – विश्रांती गृह… ) तात्काळ पुरावा , कमी केलेले वेतन दुरुस्त करून शुद्धी पत्रक काढा, मार्च 2018 पर्यंत मजुरी व लेव्ही ची झालेली लूट वसुल करा आणि लूट करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा….. इ. मागण्यासाठी सदरील निदर्शने करण्यात आली……
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळा चे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांचे उपस्थितीत झालेल्या या निदर्शनात जिल्ह्यातील माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्यात प्रामुख्याने साथी छगन गवळी, साथी प्रवीण सरकटे, साथी कैलास लोखंडे, साळुंके मामा , साथी देवचंद आल्हाट, निलेश सरदार, राजू कंठाळे , जगन भोजने, किरण पगारे, संजय काकडे, फारुख भाई, वासिम भाई ,शेख रफिक, भारत गायकवाड , शिवाजी राऊत, शेख सलीम, इ चा सहभाग होता…
माथाडी कामगारांचे प्रश्नात जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रश्न सोडविले नाहीत तर, नवनिर्वाचित आमदार – खासदाराना या प्रश्नात लक्ष घालायला भाग पाडले जाईल व तरीही प्रश्न सुटले नाही तर मुंबई येथे विधी मंडळावर धडक दिली जाईल असा इशारा, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिला आहे.