Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Politics : मोठी बातमी : भाजप -शिवसेना : दोन्हीही पक्षांचा मुख्यमंत्री पदावर दावा , आज स्वतंत्ररित्या राज्यपालांना भेटणार

Spread the love


महाराष्ट्राच्या राजकारणातील हि मोठी बातमी असून या बातमीनुसार भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर स्वतंत्ररित्या दावा करण्यात आला असून भाजपच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेच्यावतीने सेना नेते दिवाकर रावते राज्यपाल भगतसिंग यांची भेट घेणार आहेत. टाईम्स  ऑफ इंडियाने हे धक्कादायक वृत्त दिले आहे.


या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या राजकारणात एक ट्विस्ट आला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती  आल्यानंतर भाजपला अपेक्षेप्रमाणे बहुमत न मिळाल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्यावर आपले सरकार बनवावे लागेल . हे लक्षात घेऊन शिवसेनेने आपली रणनीती आखण्यासाठी शनिवारी उद्धव ठाकरे त्यांनी मातोश्रीवर बैठक घेऊन आपल्या नवनिर्वाचित आमदारांची मते विचारली होती. त्यावर उपस्थित आमदारांनी मुख्यमंत्रीपदावर अडीच अडीच वर्षे कालावधीसाठी भाजपवर दबाव टाकावा तसेच सत्तेमध्ये ५०-५० टक्के वाटा द्यावा अशी मते मांडत असताना जे काही ठरेल ते भाजपकडून लेखी स्वरूपात घ्यावे असा आग्रह धरला  होता. त्यानुसार शिवसेनेने भाजपवर आपला दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान आपले संख्याबळ वाढविण्यासाठी या दोन्हीही पक्षांनी अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यानुसार भाजपने आपलीकडे काही अपक्ष आमदार आणताच सेनेनेही काल सकाळी दोन आमदारांचा पाठिंबा घेत भाजपाला दणका दिला तर सायंकाळी भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनीही भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला.

या सर्व पार्श्वभूमीवर टाईम्सच्या वृत्तानुसार एकीकडे आज सोमवारी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक अहवाल सादर करतील आणि पुढील सरकार स्थापन करण्याबाबत त्यांना अधिकृत पत्र देतील. तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर हे सुद्धा राज्यपाल कोषारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापानेचा दावा करतील. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे.

महाराष्ट्रातील विधानभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सेना यांनी महायुती करून निवडणूक लढविल्या या महायुतीतील सरकार स्थापन करण्यासाठीचे बहुमतही मिळविले परंतु भाजपने आपली कायम अडवणूक , फसवणूक आणि अवमान केला हि सेनेची भावना आहे . शिवाय भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल इतके स्पष्ट बहुमत त्यांच्याकडे नाही , अशा परिस्थितीत खिंडीत गाठून आधीच वर्षांसाठी भाजपकडून मुख्यमंत्रीपद मिळवायचे आणि सत्तेतही महत्वाची पदे मिळविताना सत्तेत ५० टक्के वाटा मागायचा हे सेनेचे धोरण आहे. हा दबाव वाढविण्यासाठी सेना या सर्व कारवाया करणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान भाजप -शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्यास या संधीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधीच कंबर कसली आहे . आता शिवसेना काँग्रेस -राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार बनविणार कि , भाजप सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची मदत घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!