Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रचार जरा हटके : नगरचे वंचितचे उमेदवार किरण काळे यांच्या वाचननाम्याने रंगल्या सर्वत्र चर्चा

Spread the love

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत  सुरू झाली असून राज्यातील प्रत्येक पक्षाने आपापले जाहीरनामे, वचननामे जनतेसमोर मांडण्यात सुरुवात केली आहे. यातच सध्या वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचनानाम्याची जोरदार चर्चा होत आहे. ‘मी गुंडगिरी करणार नाही, कोणाचे खून करणार नाही’, असे हटके वचन किरण काळे यांच्या वचननाम्यात पाहायला मिळत आहेत.

किरण काळे यांनी आपला २१ कलमी वचननामा प्रकाशित करताना आपण अहमदनगर शहरासाठी काय-काय करणार आहोत या बरोबरच एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय-काय नाही करणार याचा देखील वचननामा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे किरण काळे यांचा हा वचननामा म्हणजे जनतेला दिलेल्या आश्वासनांचा पाढा नसून तो प्रतिस्पर्धी उमेदवारांची राजकीय कुंडली लोकांपुढे मांडण्याचा केलेला अनोखा प्रयत्न आहे. या वचननाम्यामुळे शहरात चौका-चौकात कुजबुज सुरु झाली असून नगरकर मतदारांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे. किरण काळे यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनिल राठोड तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप हे उमेदवार रिंगणात उभे आहेत.

वचननाम्यात दिलेली काही वचने खालीलप्रमाणे आहेत-

१. मी कधीही जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.

२. मी कधीही शहरातील तरुण आणि नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणार नाही.

३. मी कधीही नगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही.

४. मी कधीही पत्रकारांना मारहाण करणार नाही.

५. मी कधीही मनपा अधिकाऱ्यांना चप्पल फेकून मारणार नाही.

६. मी कधीही एमआयडीसीतील उद्योजकांना खंडणी मागणार नाही.

७. मी कधीही कुठल्याही कामात टक्केवारी खाऊन माझे स्वतःचे घर भरणार नाही.

८. मी कधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून भ्रष्टाचार करणार नाही.

९. मी कधीही कोणाचीही कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही.

१०. मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे संघटन करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!