Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संघप्रमुख मोहन भागवतांच्या मते “भारतात मॉबलिंचिंग होत नाही, संघाचा अशा घटनांशी संबंध नाही, लोक शांततेत राहतात, …”

Spread the love


“देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर अन्य समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात. एखाद्या समुदायातील काही लोकांनी लोकांनी कोणावर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही. अशा हिंसक घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीएक संबंध नसतो. याउलट संघ अशा घटना रोखण्याचे काम करत असल्याचे” भागवत म्हणाले. “आमच्याकडे लिंचिंग हा शब्द कधीच नव्हता. तो शब्द बाहेरून आला, असंही ते म्हणाले. हा भारत आपला आहे. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत सर्वांनी राहिलं पाहिजे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.


नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात  बोलताना , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मॉबलिंचिंग भारतात होत असल्याचा इन्कार करताना अशा  घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असा दावा केला आहे. इतकी विविधता असूनही लोक भारतात शांततेत राहतात आणि असे उदाहरण भारताशिवाय जगात कुठेही मिळत नाही असेही भागवत म्हणाले. ते बोलत होते. यावेळी भागवत यानी राजकीय, समाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले.

देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांवर भाष्य करताना  मोहन भागवत यांनी  येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धांच्या काळातील उदाहरणे दिली. येशू ख्रिस्ताच्या काळात एका स्त्रीवर सर्वांनी हल्ला केला, लोक तिला दगड मारू लागले. मात्र ज्याने पाप केले नाही, त्यानेच पहिला दगड मारावा असे येशू ख्रिस्ताने सांगितले…. गावात पाण्यावरून झालेले भांडण गौतम बुद्धान सोडवले असे सांगत लिंचिंग हा शब्द आपल्याकडील नाही, तो बाहेरून आला असे सांगत भारतात लिंचिंग हा प्रकार घडतच नसल्याचे भागवत म्हणाले.

मॉब लिंचिंग सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे असे भागवत म्हणाले. अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे. पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा, असेही भागवत पुढे म्हणाले.

देशात काही ठिकाणी अत्याचाराच्या  घटना घडतात असे नाही. मात्र त्या एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर केल्या असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचाराला संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा आपले काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे त्यांना ती केली जाईल असेही भागवत म्हणाले.

भारतातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने फार चांगले काम केले आहे. या सरकारने उपाययोजना नक्कीच केल्या आहेत. तेव्हा देशातील आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे भागवत म्हणाले. हिंदू राष्ट् आहे. हिंदू कोण तो जो समजतो की विश्वात एक सत्य आहे मात्र त्याला पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. आपापल्या श्रद्धेनुसार चला, मोक्षाकडे सर्वजण जाणार. धर्म का पालन करू, धर्म आणि पंथात फरक, मानवधर्म हा धर्म असतो, मात्र पंथ वेगळे आहेत. .

अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी थेट विदेशी गुंतवणूक आणि उद्योगांचे खासगीकरण आवश्यक असून सरकार त्यासाठी बाध्य झाले आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी खासगीकरण आणि एफडीयायचे समर्थन केले. वैश्विक अर्थव्यवस्थेत मंदी आहे. त्याचे सर्वत्र परिणाम दिसून येत आहे. अमेरिका आणि चीनमधील आर्थिक स्पर्धेचे परिणाम भारताला भोगावे लागत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार गेल्या अडीच महिन्यापासून कार्यरत आहे. जनतेच्या हिताप्रती सरकार संवेदनशीलतेने कटिबद्ध आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. या तथाकथित आर्थिक मंदीतून आपण निश्चितपणे बाहेर येणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!