Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

३७० तोफांची सलामी !! भाजपच्या प्रचार सभांना अमित शहांनी केला प्रारंभ , पण ३७० चा मुद्दा बीडकरांना भावला नाही …सोशल मीडियावर खेचाखेची …

Spread the love

सावरगावमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित होते. या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि अमित शाह यांच्या भाषणामध्ये शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम ३७० च्या मुद्द्यांवर भर दिला पण हा मुद्दा बीडकरांना भावाला नाही परिणामी सोशल मीडियावर शहांच्या या राष्ट्रभक्तीच्या मुद्द्याची बरीच खेचा खेची चालू आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी आलेल्या शाह यांचे स्वागत करण्यासाठी  ३७० तोफांची सलामी देऊन  ३७० राष्ट्रध्वज फडकवण्यात आले होते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये, ‘पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमत दिल्यानंतर पाच महिन्यांमध्ये सरकारने कलम ३७० रद्द केले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही. कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का?’ असा सवाल उपस्थितांना आपल्या भाषणामधून केला.

अमित शहा यांचा हाच धागा पकडून पंकजा यांनाही आपल्या भाषणातून राष्ट्रभक्ती या विषयावर जोर दिल्याचे पहायला मिळाले. ‘आपल्या देशात राष्ट्रभक्तीचं केवळ सर्वांना एकत्र बांधू शकते. कलम ३७० च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कलम ३७० हटवून न्याय मिळवून दिला.

शहा पुढे म्हणाले कि , लोकसभा निवडणुकीत देशभरात तुम्ही सर्वांनी नरेंद्र मोदी यांना ३०० जागा निवडून दिल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केवळ ५ महिन्यात जम्मू-काश्मीरमधील विशेष राज्याचे दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द करून देशाला राष्ट्रभक्तीच्या धाग्यात विणण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले, असे सांगतानाच वंचित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर केले.

पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील आयोजित केलेल्या सावरगांव घाट येथे दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खास उपस्थिती दर्शवून महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत बोलताना शहा म्हणाले, मोदी सरकार हे वंचित, शोषित आणि ओबीसी समाजासाठी भगवान बाबा यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचे काम करीत आहे. मोदी सरकारने ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा देण्याचे काम केले आहे. तसेच ओबीसी समाजासाठी संविधानिक आयोग बनवण्याचे काम केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात वंचित समाज आणि ओबीसी समाजासाठी भाजप पुढे जात आहे, असे शहा म्हणाले.

दरम्यान, या भाषणामध्ये स्थानिक स्तरावरील एकाही प्रश्नावर कोणत्याच नेत्याने भाष्य न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अमित शाह यांनी आपले भाषण राजकीय मंचावरुन नसल्याचे सांगत पंकजा यांना शुभेच्छा देत भाषण संपवले. दरम्यान या सभेसाठी आलेल्या शाह यांचे स्वागत ३७० तोफांची सलामी देत ३७० राष्ट्रध्वज फडकवत करण्यात आले. महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजपाचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!