Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : रेकॉर्डवरील ८ चोरट्यांना मुद्देमालासह अटक , विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक मोहीम

Spread the love

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचाही पोलिसांनी लावला छडा , निवृत्त शिक्षिकेला अटोरिक्षात लुटणारे चोरटेही गजाआड

औरंगाबाद – विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी  रेकाॅर्डवरील गुन्हेगार राजकिय पक्षांच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध धडक मोहीम उघडली असून विविध चोरी प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत. या नंतरही निवडणूकांच्या धामधूमीत सामील होणार्‍या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांवर अशीच कारवाई होईल अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी हद्दपार केलेल्या चोरट्याने, शहरात रेल्वेस्टेशनवर अपरात्री येणार्‍या प्रवाशांनालुटणारी गॅंग तयार केल्यानंतर गुन्हेशाखेने ही गॅंग पाळत ठेवून उध्वस्त केली. या गॅंगकडून२ लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला.

वसीम शेरअली तेली(२८), नदीमखान हुसेनखान, (३०) वसीम अजमलखान(२८) सर्व रा. जळगाव जमीर मुनाफ बागवान (३२)रा. चिकलठाणा औरंगाबाद अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील वसिम शेरअली तेली याला पुणे पोलिसांनी हद्दपार केलेले आहे. वरील तिन्ही आरोपींनी गेल्या २३सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या काळात मुकुंदवाडी आणि खडकेश्वर भागातील लाॅजवर मुक्काम केला. व चिकलठाण्याच्या जमीर मुनाफ बागवान या रिक्षाचालकाला मुनाफा द्यायचे अमीष दाखवंत प्रवाशांना लुटमार सुरु केली. गुन्हे शाखेला या गॅगचा सुगावा लागताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीसआय अमोल देशमुख , नंदकुमार भंडारे, मुकुंद सोनवणे, योगेश गुप्ता, रितेश जाधव यांनी सहभाग घेतला .त्याच प्रमाणे गुन्हे शाखेने पुंडलिकनगर पोलिसांच्या भदतीने शेख जावैद उर्फ टिप्या याच्यावर एम.पी.डी.ए.ची कारवाई केली. या कारवाईत एपीआय घन्नशाम सोनवणे आणि पोलिस कर्मचारी द्वारकादास भांगे यांनी सहभाग घेतला होता.

तर पुंडलिकनगर पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या   शे.रफीक शे.चिंद (२९) रा. जवाहर काॅलनी,शे.मोहसीन आरिफ बागवान रा. जवाहर काॅलनी  या दोघांना अटक केली. यांनी १३ सप्टेंबर २०१९ रोजी यांनी सचिन गायकवाड यांची ५ ग्रॅम सोन्याची चैन हिसकावली होती ती चैन त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. तसेच उस्मानपुरा पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजीरेल्वेस्टेशहून घरी जाणार्‍या निवृत्त शिक्षीकेला रिक्षात सहप्रवासी बनवून उत्तरप्रदेशच्या भामट्यांनी २ लाख ९ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांच्या तपासानुसार मौ.नमीर मो. मजिहिर अन्सारी याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मंगला जोशी यांचे दागिने लंपास केले होते. उस्मानपुरा पोलिसांनी मुद्देमालासहित हा चोरटा पकडला.या कारवाईत पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानपुरा  पोलिसांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!