Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चोरीच्या वाहनावर बनावट क्रमांक टाकून विक्री करणारी टोळी गजाआड

Spread the love

औरंगाबाद : वाहनांची चोरी केल्यानंतर आरटीओ कार्यालयातील कर्मचा-यांना हाताशी धरुन भंगारातील वाहनांची कागदपत्रे हस्तगत केल्यानंतर त्याआधारे इंजिन, चेसीस आणि बोनेट क्रमांक पंचिंग व त्यावर अॅहल्युमिनीयमची प्लेट चढवून वाहने विक्री करणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर एकाचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी गुरूवारी (दि.२६) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनिल रामसिंग जोनवाल (वय २९, रा. खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, ह. मु. जाधववाडी, टिव्ही सेंटर, हडको), संजय धनसिंग जंघाळे (वय ३५, रा. डोंगरगावशिव, ता. फुलंब्री),संदीप गुलाबसिंग जोनवाल (वय २१, रा. खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, ह. मु. श्रीकृष्णनगर, एन-९, हडको),ईस्माईल शहा सफरअली शहा (वय ४४, रा. आडगाव माऊली, ह. मु. मिसारवाडी) असे वाहन चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून कार क्रमांक (एमएच-२०-बीके-९७८७), ट्रक क्रमांक (एमएच-२०-डीई-४१७६),(एमएच-२३-एयू-०५१५), (एमएच-१५-बीजे-८२२२) यांच्यासह एक विना क्रमांकाची कार जप्त केली आहे.
ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, सहायक निरीक्षक महेश आंधळे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळंके, सहायक फौजदार झिया, गफार खान पठाण, जमादार गणेश मुळे, श्रीमंत भालेराव, रतन वारे, सुनील शिराळे, बाळु पाथ्रीकर, विठ्ठल राख, दीपेश नागझरे, धीरज जाधव, संजय भोसले, योगेश तरमाळे, जीवन घोलप, पुंगळे आणि थोटे यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!