Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : उपप्राचार्याविरुद्ध महिला लेखाधिकायाची छेड काढल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : महिला लेखाधिका-यास आपल्या दालनात बोलावून घेत उपप्राचार्याने तिची छेड काढत विनयभंग केल्याची तक्रार छावणी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.  ही घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नागसेनवन परिसरातील एका तंत्रशिक्षण महाविद्यालयात घडली असून  संदीप लक्ष्मण कीर्तने (वय ३६, रा. न्यु.नंदनवन कॉलनी) असे विनयभंग करणा-या उपप्राचार्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisements

पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , १९ सप्टेंबर रोजी सदर महिला आपल्या कार्यालयात काम करीत असतांना उपप्राचार्य कीर्तने याने तिला आपल्या दालनात बोलावून घेतले. पीडित महिला कीर्तने यांच्या दालनात गेल्यावर कीर्तने याने महिला लेखाधिका-यास बसण्यास सांगीतले. त्यानंतर तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधुन पीडितेचा हात धरून छेड काढली. पीडितेने जाब विचारला असता कीर्तने याने पीडितेस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हा प्रकार बाहेर कोणाला सांगितल्यास नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी दिली होती.

Advertisements
Advertisements

दरम्यान, पीडितेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडितेचा पती कीर्तने यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेला असता कीर्तने याने पीडितेच्या पतीला देखील शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात संदीप कीर्तने याच्याविरूध्द छेड काढुन विनयभंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!