Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : News Update Triple Murder : एकतर्फी प्रेमास नकार दिल्यानेच केला त्याने बोराडे कुटुंबियांचा घात

Spread the love

तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीस पोलिस कोठडी
औरंंंगाबाद : शहर हादरवून टाकणा-या तिहेरी हत्याकांडामध्ये एक नवीन खुलासा समोर आला आहे. आरोपीने मित्राच्या बहिणीला प्रेम करत असल्याचे सांगून तीच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केल होता. मात्र तीने प्रतिकार करुन त्याला हाकलून लावले होते. प्रेमास नकार दिल्यानेच आरोपीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येत आहे. दरम्यान आरोपी अमोल भागीनाथ बोर्डे (वय २६, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) याला गुरुवारी (दि. २६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.३०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले.
प्रकरणात मयत दिनकर भिकाजी बोराडे यांची मुलगी विमल गजानन गावडे (वय ३५, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) हिने तक्रार दिली. तक्ररीनुसार, विमलचे लग्न १८ वर्षापूर्वी गजानन गावडेशी झाले होते. मात्र त्यांच्यात पटत नसल्याने सात-आठ महिन्यांपासून विमल ही एक मुलगी व मुलाला घेऊन आई-वडीलाकडे चौधरी कॉलनीत राहण्यासाठी आली होती. दरम्यान गल्लीत राहणा-या आरोपी अमोल बोर्डेला विमल लहानपणापासून ओळखत होती. तो कामानिमित्त विमलचे आई-वडील दिनकर बोराडे यांच्या घरी येत-जात होता. घटना घडण्याच्या दहा-बारांदिवसांपूर्वी बोराडे कुटुंब कामानिमीत्त बाहेर गेले होते. त्यावेळी विमल घरी एकटीच असल्याची संधी साधून अमोल बोर्डे याने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विमलने त्याला घरातून हाकलून दिले होते. सायंकाळी आई-वडील घरी परत आल्यावर विमलने त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. या घटनेच्या दोन ते तीन दिवसानंतर विमलच्या आईने अमोल बोर्डे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अमोलने मी तुम्हा सगळ्यांना बघुन घेईन अशी धमकी दिली होती.
दरम्यान, बुधवारी विमल नेहमी प्रमाणे कामाला गेली असतांना अमोल बोर्डे याने विमलचे वडील दिनकर भिकाजी बोराडे (वय ५५), आई कमलाबाई दिनकर बोराडे (वय ५०), भाऊ भगवान दिनकर बोराडे (वय २६) यांच्यावर चावूâने सपासप वार करून निर्घुणपणे खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी अमोल बोर्डे याच्याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तात्काळ अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!