Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे-बेंगळूर रस्त्यावरील अपघातात एकाच कुटुंबातील सहा ठार, दोन गंभीर

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ येथे झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले आहेत. या अपघातात दोघे गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

मृतांमध्ये कर्नाटकातील धारवाडच्या सौदागर कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ जवळील गांधीनगर येथे सौदारगर कुटुंबीयांची कार आली असताना गाडीचा ताबा सुटल्याने ही कार बाजूच्या झाडाला आदळली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला, या वरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. या अपघातात सौदागर कटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन पुरूष, दोन महिला, सुमारे साडेतीन वर्षांच्या लहान मुलगा आणि पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!