Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धनगर समाजाला शासनाचा दिलासा : अनुसूचित जमातीसाठी लागू असलेल्या २२ योजनांचा लाभ देण्याचा निर्णय

Advertisements
Advertisements
Spread the love

धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायम असला तरी या समाजासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमाती (एसटी)साठी लागू असलेल्या २२ योजनांचा धनगर समाजालाही लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धनगर समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अनुसूचित जमातीसाठी लागू असलेल्या २२ योजनांचा धनगर समाजालाही लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे शिष्यवृत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहीनांना जमिनी तसेच घरकुल योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या धनगर समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!