Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास ते आदित्य ठाकरेच हि लोकभावना : संजय राऊत

Spread the love

शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाले तर त्या पदावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेच असावेत अशी पक्षासह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेच्या जळगाव जागेबाबत बोलतांना कुणी लाटेमध्ये
शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाले तर त्या पदावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेच असावेत अशी पक्षासह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेच्या जळगाव जागेबाबत बोलतांना कुणी लाटेमध्ये जिंकले म्हणून जागा त्यांची होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप-सेना युती २८८ जागा लढवेल त्यातील १४५ जागांवर उमेदवार शिवसेनादेणार असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या जनआशिर्वाद यात्रेसाठी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. पाचोरा येथून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज खासदार संजय राऊत हे जळगावात आले होते. या पत्रकार परिषदेत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

विरोधी पक्ष कुचकामी आहे, त्यांना त्याची लाज वाटली पाहिजे ते हे काम करीत नाहीत. म्हणून शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले असल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली.

यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र हा शिवसेनेच्या नेहमीच पाठीशी असल्याने आदित्य ठाकरे यांच्या या यात्रेची सुरुवात पाचोरा येथून करण्यात येत आहे. संघटना बांधणी व निवडणुकीची तयारी या दृष्टीने यात्रेचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. भाजप- सेना युतीची घोषणा झाली आहे. जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. मुख्यमंत्रीपद देखील समसमानच राहणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आल्यास त्या पदावर आदित्य ठाकरेच असतील अशी पक्षात व जनतेत लोकभावना असल्याचे त्यांनी सांगितले.  जागेचा फार्मुला मागीलप्रमाणेच राहील कुणी लाटेमध्ये जिंकला म्हणून ती जागा त्यांची होत नाही, अशा शब्दात राऊत यांनी जळगावच्या जागेवर सेनेकडून दावा होण्याचे संकेत दिले. तसेच मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचा संघर्ष पक्षाला माहीत आहे. मुक्ताईनगरच्या जागेबाबत देखील चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!