Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Dongari Collapse : मृतांची संख्या १४, ९ जखमींवर रुग्णालयात उपचार, ३० तासानंतर मोहीम थांबली

Spread the love

डोंगरी येथील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ झाली असून ९ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर सुरू झालेलं शोध व बचावकार्य सुमारे ३० तासांनंतर थांबवण्यात आलं आहे. इमारतीचा संपूर्ण ढिगारा हटवण्यात आला असून बचावकार्य समाप्त झाल्याचं एनडीआरएफने जाहीर केलं आहे.

‘केसरबाई-१’ या चार मजली अधिकृत इमारतीमागे ‘केसरबाई-२’ ही अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. ‘केसरबाई-२’मध्ये चार ते पाच कुटुंबं आणि काही व्यावसायिक गाळे होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता इमारत हलल्यासारखी वाटली आणि क्षणार्धात तीन मजले कोसळले. इमारतीजवळच्या बेकरीतील काहीजणांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिस, अग्निशमन जवान आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी मदतकार्य सुरू केले. हे मदत व बचावकार्य सुमारे ३० तासानंतर आज सायंकाळी पूर्ण झाले असून मृतांचा आकडा १४ वर पोहचला आहे. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!