Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : रांजणगावातही अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न , बँकानी एटीएमची सुरक्षा वाढवावी – आयुक्त चिरंजीव प्रसाद

Spread the love

https://youtu.be/aSJXQ8d6C3k

पोलिस आयुक्तांनी केली घटनास्थळाची पाहणी

औरंंंगाबाद येथील  देवळाई चौकातील एसबीआय बँकेचे एटीएम मशिन चोरट्यांनी शनिवारी उचलून नेल्याच्या घटनेनंतर पडेगाव परिसरातील मिसबाह कॉलनीतील एटीएम मशिन गॅसकटरच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला होता. त्यानंतर अवघ्या ४८ तासाच्या आत चोरट्यांनी रांजणगाव-शेणपुंजी येथील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. गेल्या चार ते पाच दिवसाच्या काळात चोरट्यांनी तीसNयांदा एटीएम मशिनला आपले लक्ष्य केल्याने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

बीड बायपास रोडवरील देवळाई चौकातील २५ लाख रूपयांची रोकड असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशिन चोरट्यांनी उचलून नेल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासाच्या आत रविवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पडेगाव परिसरातील मिसबाह कॉलनी येथील एटीएम मशिन गॅसकटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन घटनामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री एक ते दिड वाजेच्या दरम्यान चोरट्याने एमआयडीसी वाळुज परिसरातील रांजणगांव-शेणपुंजी येथे असलेले अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने एटीएम मशिनच्या पाठीमागे असलेले प्लायवूड कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, मधुकर सावंत, वाहतूक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा सीसीटीव्ही वॅâमेNयात वैâद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.

बँकानी एटीएमची सुरक्षा वाढवावी – आयुक्त चिरंजीव प्रसाद

गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी एटीएम मशिनला आपले लक्ष्य केले आहे. शहरातील अनेक एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नाहीत, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही वॅâमेरे मोडकळीस आले आहेत. बॅकांनी एटीएमची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमून अद्यायवत सीसीटीव्ही वॅâमेरे बसवावेत असे पोलिस आयुक्त चिरंजी प्रसाद यांनी बँकाना सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!