Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नव्या मुंबईत तिघांच्या हत्येने खळबळ , खुनी आणि खुनाचे कारण अद्याप अंधारात ….

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी मुंबईमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे एमआयडीसीमध्ये भंगार विक्री करणाऱ्या तिघांची हत्या करण्यात आली आहे. तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्यात आणि पोटात वार करून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बंद कंपनीत मृत तिघांचे भंगाराचे दुकान होते. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळच्या वेळी रक्ताच्या थारोळ्यात तिघांचे मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Advertisements
Advertisements

इर्शाद वय २० वर्ष, नौशाद वय १७ वर्ष, राजेश वय २८ अशी हत्या झालेल्या तीघांची नावं आहे.  आर्थिक वादातून किंवा चोरीच्या उद्देशाने या तिघांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच बंद कंपनीतून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

एकाच वेळी, एकाच ठिकाणी तिघांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. पण अद्याप हत्या कोणी आणि का केली याचं ठोस कारण समजू शकलेलं नाही. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, मृतांची माहिती मिळवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!