Chandrpur : गुप्तधनाच्या वेडापायी त्याने पत्नीसोबत काय केले ते पहाच … !!

चंद्रपुर जिल्ह्यातील शेगांव येथे एका व्यक्तिने आपल्या पत्नीला ‘गुप्त धाना’च्या लोभापाई उपाशी ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय पती आपल्या पत्नीचा प्रचंड मानसिक छळ करत होता. पत्नीचे वडील जेव्हा तिला भेटालया गेले तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपुरच्या शेगांवात हे दोन्ही पती-पत्नी वास्तव्यास होते. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. मात्र विवाह झाल्यानंतर त्याने पत्नीचा छळ सुरु केला. त्यामागे कारणही अगदी तसेच आहे.
एका स्वयंघोषित बाबाने पत्नीला उपाशी ठेवले तर ‘गुप्त धन’ मिळेल असे भाकीत वर्तवले होते. पती याच भाकिताच्या पाठिमागे वेडा झाला. त्याने आपल्या पत्नीचा प्रचंड छळ केला. याशिवाय तिला ५० दिवस फार थोड्या प्रमाणात जेवन दिले. त्याचबरोबर तो पहाटे तीन वाजता पत्नीला उठवून तिच्याकडून पुजा करुन घेत असे. पीडित महिलेचे वडिल जेव्हा तिला भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार दिसला. ते पीडितेला आपल्यासोबत घरी घेऊन गेले. या घटनेसंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या पतीवर आणि त्याच्या कुटुंबियावर गुन्हा दाखल केला आहे.