Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात “संघा”चा पाठ घेतल्याने उफाळला वाद

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. त्यावरून वाद उफाळला आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याला जोरदार विरोध दर्शविला. काही संघटनांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला. दरम्यान कुलगुरू डॉ. काणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावर कुठलेच भाष्य केलेले नाही.

Advertisements

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टिष्ट्वटरवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माण कार्यात भूमिका हे शिकविताना, आरएसएसने १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा विरोध केला होता. भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचा विरोध केला होता, हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, स्वातंत्र्य संग्रामात गद्दारी केली, ज्यांच्या विचारामुळे महात्मा गांधींची हत्या झाली, त्यांचा इतिहास आता शिकविला जाणार आहे.

Advertisements
Advertisements

एमए इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात शिकविले जात आहे. एमएच्या चौथ्या सत्रात आधुनिक विदर्भाचा इतिहास या विषयाच्या चौथ्या युनिटमध्ये संघाचा मुद्दा आहे. पदवी विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी म्हणून बीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यात कुठलेही राजकारण नाही, असे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी सांगितले.

देश निर्माणात ‘आरएसएस’चे स्थान…
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी मंजुरी दिली होती. अभ्यासक्रमात कम्युनिझम उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन यांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र, अभ्यासक्रमात बदल करताना कम्युनिझमऐवजी ‘देश निर्माणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान’, या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण अभ्यासक्रमातून कम्युनिझमचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.
अन्य संघटनांनीही केला विरोध
शिवाजी विद्यार्थी संघ, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनीही निवदेनाद्वारे तीव्र विरोध दर्शवित कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?

ब्रिटीशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाचा केलेला विरोध, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यापासून इच्छुक स्वयंसेवकांना परावृत्त करणे, १९४२ चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटीशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतिक आहेत. संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंड्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वत:च्या कार्यालयावर न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे. – अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास शिकविणार का?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापीठातून शिकविला जाणार का, असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाने उपस्थित केला आहे. हा धडा तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन दिला. आरएसएसने स्वातंत्र्याच्या लढ्याला विरोध केला होता. १९४२ च्या चले जाव आंदोलनाला त्यांनी विरोध केला होता. तसेच ५२ वर्षापर्यंत आरएसएसने देशाचा राष्ट्रध्वज कधीच फडकवला नाही. हा आरएसएसचा खरा इतिहास आहे. तेव्हा बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) पूर्ण एक धडा सामील करणे, पूर्णपणे अवैध आहे. देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाºयांचा इतिहास अभ्यासक्रमात आम्ही सामील होऊ देणार नाही, याबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल. विद्यापीठाने तातडीने हा धडा मागे न घेतल्यास भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी याविरुद्ध राज्यभरात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष रवी शेंडे, नीतेश जंगले, राजू जंगले, संदीप मेश्राम, राजेश रंगारी, अतुल शेंडे उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!