Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatak Drama : अमेरिका दौरा अर्धवट सोडून कुमारस्वामी स्वराज्यात परतले , परिस्थिती चिंताजनक

Spread the love

कर्नाटकमधील राजीनामा नाट्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी अमेरिका दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मंगळवारी होणाऱ्या विधीमंडळ बैठकीला काँग्रेसच्या सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असे परिपत्रक पक्षाकडून काढण्यात आले आहे. बैठकील उपस्थित न राहिल्यास कारवाई करण्याचा इशाराही परिपत्रातून काँग्रेस आमदारांना देण्यात आला आहे.

भारतात परत येताच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जेडीएस पक्षाच्या आमदारांची बैठक घेण्यासाठी बेंगळुरूत दाखल झाले आहेत. कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आलं आहे. जर १३ आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहोचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची बैठक बोलावली आहे.

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ९ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, भाजपची या संपूर्ण घटनाक्रमावर बारीक नजर आहे. सत्तास्थापनेबाबत विचारता, आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांच्या निर्णयानंतर भाजप पुढील निर्णय घेईल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते येड्डीयुरप्पा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे २२४ आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएसकडे केवळ १०५ आमदार उरले आहेत तर भाजपचेही १०५ आमदारच आहे. या १३ही आमदारांनी राजीनामा मागे न घेतल्यास सरकार अल्पमतात जाण्याची चिन्हं आहेत. मंगळवारी विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर विचार करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!