Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnataka : कर्नाटकात राजकीय पेच; काँग्रेस-जेडीएसच्या बैठका

Advertisements
Advertisements
Spread the love

कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आलं आहे. जर १३ आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहोचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची बैठक बोलावली आहे.

Advertisements

काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक ९ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, भाजपची या संपूर्ण घटनाक्रमावर बारीक नजर आहे. सत्तास्थापनेबाबत विचारता, आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांच्या निर्णयानंतर भाजप पुढील निर्णय घेईल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते येड्डीयुरप्पा यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे २२४ आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएसकडे केवळ १०५ आमदार उरले आहेत तर भाजपचेही १०५ आमदारच आहे. या १३ही आमदारांनी राजीनामा मागे न घेतल्यास सरकार अल्पमतात जाण्याची चिन्हं आहेत. मंगळवारी विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर विचार करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!