Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भरधाव कारने ६ लोकांना चिरडले, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

काल विक्रोळीत झालेल्या मोठ्या अपघातानंतर आज मुंबईतल्या शिवडी भागात रविवारी एका भरधाव कारने ८ लोकांना चिरडले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी आर.के रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत. हे लोक बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होते.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शाहबाज वाडी हे आपल्या पत्नीसह आपल्या कारने जात होते. जात असताना त्यांचं आपल्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कारने दिशा सोडून दुसरीकडे वळण घेतलं. कार बाजूच्या बस स्टॉपकडे वळली आणि बसची वाट पाहात उभ्या असलेल्या माणसांना कारने चिरडले. या अपघातात कार चालक शाहबाज आणि त्याची पत्नीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान काल विक्रोळी भागात फुटपाथवर झोपलेल्या चार जणांना टँकरने चिरडले होते त्यात दोन महिला आणि एका बालकाचा करुण अंत झाला  तर एका महिलेवर रुग्न्यालयात उपचार चालू आहेत तर आज मुंबईत आज हि दुसरी घटना घडली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!