Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इंग्लंडचे बांगला देशासमोर ३८६ धावांचे तागडे आव्हान , सलामीवीर जेसन रॉयचं धडाकेबाज शतक

Spread the love

सलामीवीर जेसन रॉयचं धडाकेबाज शतक आणि त्याला जॉनी बेअरस्टो, जोस बटलर यांनी दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर इंग्लंडने ३८६ धावांचा डोंगर उभा केला आहे. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशसमोर ३८७ धावांचं आव्हान असणार आहे. जेसन रॉयने १२१ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना मश्रफी मोर्ताझा आणि मुस्तफिजुर रेहमानने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून सर्वात प्रथम गोलंदाजी करण्याचा बांगलादेशच्या कर्णधाराचा निर्णय पुरता चुकला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो जोडीने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. मश्रफी मोर्ताझाच्या गोलंदाजीवर बेअरस्टो आपलं अर्धशतक झळकावून माघारी परतला. यानंतर रॉयने जो रुटच्या साथीने डाव सावरत आपलं शतक साजरं केलं. आपलं दीड शतक झळकावल्यानंतर रॉय मेहदी हसनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी परतला.

जो रुट माघारी परतल्यानंतर मैदानात आलेल्या जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनीही फटकेबाजी करत संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलरने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत आपलं अर्धशतक झळकावलं. दोघेही फलंदाज आपापली जबाबदारी पूर्ण करुन बाद झाले. यानंतर इंग्लडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला ३८६ धावांचा टप्पा गाठून दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!